आशिष बडवे – १४ जानेवारी २००८
नागपुर दि. १४ महाराष्ट्र सरकारच्या पुर्नवसन खात्याचे प्रधान सचिव यांनी पंतप्रधान कार्यालयाला सादर केलेल्या कर्जमुक्तीच्या प्रस्तावामध्ये यावर्षी पिक कर्ज घेतलेल्या शेतकर् यांचाच समावेश केला असुन मागिल आठवड्यात पुणे येथे नाबार्डचे नवनियुक्त अध्यक्ष उमेश सारंगी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकर् यांना कर्जमुक्ती देण्याचे प्रस्तावावर जी चर्चा करण्यात आली त्यामध्ये सहकार खात्याने सर्व जिल्हा उपनिबंधका मार्फत १ हेक्टर पर्यंत मर्यादा असणारे थकीत पिक कर्ज व २ हेक्टर पर्यंत थकीत असलेले पिक कर्ज यांची आकडेवाडी सहकार खात्याला सादर केली आहे. व या सोबतच पुन्हा एकदा संपुर्ण व्याजाच्या रक्कमेचा सुध्दा गोषावारा सरकारने मागीतला आहे. यावरून खुप चर्चा करून कापुस उत्पादक शेतकर् यांना देण्यात येत असलेली पिक कर्जमाफी जेमतेम २ टक्के शेतकर् यांच्या हाती पडणार अशी खळबळजनक माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी आज एका पत्रकाव्दारे दिली.
आपण संपुर्ण कर्जमाफी साठी मानवाधिकार आयोग. उच्च न्यायालय यांच्या मार्फत वारंवार पाठपुरावा केल्या नंतर सरकारने जी पावले उचलली आहेत त्यामध्ये सनदी अधिकारी कर्जमाफी द्यावी परंतु त्याचा फायदा शेतकरयांना न होता पुन्हा एकदा बँकांना व्हावा या प्रयत्नात असल्याचे दिसते. यापुर्वी पंतप्रधान पँकेज मध्ये सरकारने थकीत पिक कर्जावरील ८४० कोटी रूपये व्याज माफीच्या रूपाने बँकांना दिल्यानंतर शेतकर यांवरील पिक कर्ज दुपट्टीने वाढले. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. याकरीता शेतकर् यांना दिलासा देण्यासाठी संपुर्ण कर्जमाफी हाच एक पर्याय असुन सरकारने त्याची तात्काळ घोषणा करणे काळाची गरज असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये कोणतीही मर्यादा न ठेवता शेतकर् यांवरील शेती कर्ज तात्काळ माफ करावे व या शेती कर्जामध्ये पीक कर्ज व लांब, मध्यम मुदतीच्या सर्व शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी येत्या २५ जानेवारीला यवतमाळ येथे विदर्भ प्रदेश विकास परिषद व विदर्भ जनआंदोलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नेते मोहन धारीया खा. दत्ता मेघे यांच्या नेतृत्वामध्ये यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय घाडगे यांनी दिली. या आंदोलनामध्ये शेतकरी नेते विजय जावंधीया, प्रकाश पोहरे, चंद्रकांत वानखडे, किशोर तिवारी, विजय घाडगे, अरविंद वाढोणकर, किसनराव भटे, मोहन मामीडवार, मुबारक तंवर, मोहन जाधव, रामलू आईटवार, तुकाराम मेश्राम, बाबाराव परचाके गुरूजी, म़ुन्ना बोलेनवार, हे उपस्थीत राहणार आहेत. २५ जानेवारीला यवतमाळ येथे होत असलेले आंदोलन यानंतर वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर व त्यानंतर २६ जानेवारीला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्याची घोषणा दत्ता मेघे यांनी केली आहे.
Filed under: Uncategorized